16 July 2020

News Flash

पूर्णब्रह्म : हिरव्या मिरच्यांची आमटी

अर्ध्या मिरच्या घेऊन ओलं खोबरं, हळद, धणे मिरी आणि आले हे सर्व अगदी गुळगुळीत वाटून घ्या.

शुभा प्रभू-साटम

साहित्य

हिरव्या मिरच्या ५-६ (शक्यतो कमी तिखट घ्याव्या), ओलं खोबरं १ वाटी, धणे १०-१२ दाणे, मिरी ५-६ दाणे, आले थोडं, कोकम, गूळ, हळद, मीठ, तेल

कृती

अर्ध्या मिरच्या घेऊन ओलं खोबरं, हळद, धणे मिरी आणि आले हे सर्व अगदी गुळगुळीत वाटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात राई, हिंगाची फोडणी करा. त्यात उरलेल्या मिरच्या घालून त्या साधारण पांढरट होईतो परता आणि थोडे पाणी, हळद घालून एक उकळी काढा. आता ओल्या खोबऱ्याचे वाटप घालून गूळ, मीठ, कोकम घालून मंद आगीवर थोडा वेळ शिजवा. मिरच्या कमी तिखट घ्या. प्रमाण आवडीनुसार कमी-अधिक करा.

टीप – डाळीचा कंटाळा येतो आणि कडधान्ये नको वाटतात तेव्हा अशी तिखट आमटी छान चव देते.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 4:55 am

Web Title: green chilli amti recipe green chillies curry zws 70
Next Stories
1 उपचारपद्धती : जल उपचार
2 मनोमनी : परीक्षा आली रे .
3 आयुर्उपचार : अभ्यंतर स्नेहपान
Just Now!
X