शुभा प्रभू साटम

साहित्य :

– नेहमीचे इडलीचे पीठ, पालक, आले, मिरची, मीठ, साखर.

कृती :

पहिल्यांदा पालक धुऊन, चिरून थोडासा शिजवून घ्यावा. आता त्यामध्ये आले-मिरची घालून तो नीट वाटून घ्यावा. इडलीच्या पिठात पालकाचे वाटण, मीठ आणि किंचित साखर घालावी आणि नेहमीप्रमाणे इडल्या कराव्यात. आवडत असेल तर इडलीवर चाट मसाला किंवा आमचूर घालू शकता किंवा पालकाचे वाटण इडलीच्या पिठात मिसळल्यावर त्यावर तुपाची हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून चुरचुरीत फोडणी द्या त्यानंतर इडल्या करायला ठेवा. मस्त मसाला इडल्या तयार होतील.