[content_full]

आयुष्यात स्टार्टरचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. (अन्नाच्या बाबतीत बोलायचं, तर हे महत्त्व अन्नन्यसाधारण असेल कदाचित!) आपल्या भारतीयांचे बाकी कुठले स्वभावविशेष असतील, नसतील, पण आळस हा आपला स्थायीभाव आहे. कुठलीही कृती करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रेरणा हवी असते. त्यालाच आपण कधीकधी स्टार्टर असं म्हणतो. हा स्टार्टर प्रत्येक गोष्टीत महत्त्वाचा असतो. किंबहुना, त्याच्या जोरावरच आपण कुठलीही गोष्ट करत असतो. कामावर जायचं असेल, तर पगार मिळण्याचा स्टार्टर लागतो. मैत्रिणीबरोबर फिरायला जायचं, तर गुलुगुलु गप्पा मारता येण्याचा स्टार्टर लागतो. काही खरेदी करायची, तर डिस्काउंटचा स्टार्टर लागतो. तसंच खाण्यासाठीही आपल्याला स्टार्टर लागतो. कुठलाही पदार्थ दिसला, की आपण तो आपल्या तोंडात गेला आहे, अशी कल्पना करतो आणि आपल्या तोंडातल्या लाळग्रंथी तो पदार्थ चावण्यासाठी, गिळण्यासाठी आवश्यक असलेली लाळ तयार करायला सुरुवात करतात, यालाच आपण तोंडाला पाणी सुटणं असं म्हणतो, असं आपल्याला शाळेत शिकवलं जातं. खाण्याच्या नव्या संस्कृतीमध्ये त्याला स्टार्टर असं म्हणत असावेत. कारण बाहेर खायला गेल्यानंतर मुख्य खाण्याच्या आर्डरच्या आधी आपण स्टार्टरची आर्डर देतो. कधीकधी स्टार्टरमध्येच पोट भरतं आणि मुख्य खाण्याच्या कार्यक्रमापर्यंत भूकच राहत नाही, ही गोष्ट वेगळी! बाकी काहीही असो, स्टार्टरची बातच निराळी असते. जेवण काय मागवायचं, हे ठरलेलं असतं, स्टार्टरचं लवकर ठरत नाही. कारण त्यातले पर्याय कधीकधी जास्त इंटरेस्टिंग असतात. कुणाची काही आवड असो, स्टार्टरमध्ये व्हेज क्रिस्पीला सगळ्यात जास्त प्राधान्य असतं. तर आज बघूया, हॉटेलमधली आपली फेवरेटडिश असलेल्या या व्हेज क्रिस्पीची घरगुती रेसिपी.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • १ मध्यम भोपळी मिरची, उभे काप करून
  • १ मध्यम गाजर, पातळ चकत्या
  • १०० ग्राम पनीर चे मोठे तुकडे
  • ४ ते ५ बेबी कॉर्न, तिरके जाडसर काप
  • १ लहान कांदा, मोठे तुकडे करावेत
  • कांदापात 2 काड्या
  • तळण्यासाठी तेल
  • १ टी स्पून तेल सॉस बनवण्यासाठी
  • २ टी स्पून लसूण पेस्ट
  • १ टी स्पून आले पेस्ट
  • २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
  • १ लहान कांदा, बारीक चिरून
  • १ टी स्पून टोमॅटो केचप
  • १/२ टी स्पून सोया सॉस
  • १ टी स्पून रेड चिली सॉस
  • १/४ कप पाणी
  • १/२ टी स्पून व्हिनेगर
  • १ टी स्पून कॉर्न फ्लोअर
  • १/४ टी स्पून मिरपूड
  • चवीपुरते मीठ
  • पिठासाठी
  • ४ टी स्पून मैदा
  • ६ टी स्पून कॉर्नफ्लोअर
  • १ टी स्पून लसूण पेस्ट
  • १/२ टी स्पून मीठ
  • २  चिमूट खायचा लाल रंग (किंवा गरजेनुसार)
  • २ चिमूट मिरपूड

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • पिठासाठी दिलेले सर्व साहित्य एका भांड्यात घालून मिक्स करावे. [मैदा, कॉर्नफ्लोअर, लसूण पेस्ट, मीठ, खायचा लाल रंग, मिरपूड]. थोडे पाणी घालून घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. यात भोपळी मिरची, गाजर, कांदा, आणि बेबीकॉर्न यांचे तुकडे घालून मिक्स करावे. सर्व भाज्या मिश्रणात व्यवस्थित घोळवाव्यात.
  • भाज्या गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्याव्यात. उरलेल्या मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवून तेही  तळून घ्यावेत.
  • कढईत १ टी स्पून तेल गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि मीठ घालावे. कांदा नीट परतावा.
  • नंतर टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, आणि १/४ कप पाणी घालावे. नीट ढवळावे. लागल्यास थोडे मीठ घालावे.
    लहान वाटीत २ टी स्पून पाणी आणि १ टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे. कढईत घालून थोडे घट्टसर होवू द्यावे. मिनिटभर ढवळावे. त्यात व्हिनेगर घालावे.
  • आता यात तळलेल्या भाज्या आणि पनीर घालून १५-२० सेकंदच मिक्स करावे. वरून थोडी मिरपूड घालावी.
  • वरून चिरलेली कांद्याची पात घालून सर्व्ह करावे.

[/one_third]

[/row]