[content_full]

रॉकी आज बऱ्याच दिवसांनी गावाला आला होता. त्याच्या बहिणीला भेटायला. तसा त्याचा जन्म याच गावातला, पण दहावीनंतर तो शहरात शिक्षणासाठी गेला आणि तिकडेच रमला. सुरुवातीला प्रत्येक सणाला, गावातल्या देवळाच्या उत्सवाला गावाला येणारा रॉकी आता दोन दोन वर्षं फिरकेनासा झाला होता. खरंतर त्याचं त्याच्या ताईवर प्रचंड प्रेम होतं, पण त्या गावात आता त्याचं मन रमत नव्हतं. माणसानं स्वतःचा विकास करायचा असेल, तर शहरातच राहायला हवं, असं त्याचं ठाम मत होतं. गावाला यायला त्याला अजिबात आवडायचं नाही. यावेळी मात्र, ताईनं गावात कसलातरी छोटा बिझनेस चालू केला होता आणि तो बघायला त्यानं यायला हवं, असा तिचा हट्ट होता. त्यामुळे त्याचा नाइलाज झाला. गावात येताना दोन चकवणारे फाटे आहेत, त्यामुळे तिथेच कुणालातरी विचारून ये, असं ताईनं बजावलं होतं, पण त्याचा स्मार्ट फोनवरच्या पत्ता सांगणाऱ्या app वर जास्त विश्वास होता आणि त्यानंच ऐनवेळी दगा दिला होता. कसाबसा तो गावात पोहोचला. ताईला फोन केल्यावर ती लगेच घरी आली. घरात स्वयंपाक तयार नव्हता. रॉकीला भूक लागली होती. घरी जेवायची त्याची इच्छा नव्हती, पण या गावात बाहेर तरी काय मिळणार, हाही प्रश्न होताच. “मी फोडणीचा भात टाकते!“ ताईच म्हणाली. पण रॉकीला फोडणीचा भात अजिबात नको होता. मुळात त्याला भात बित खायचाच नव्हता. सध्याच्या त्याच्या डाएटचं वेळापत्रकही त्यानं सांगून टाकलं. ताईला जरासं वाईट वाटलं. “बरं, कांदा नाही घालत, वेगळ्या पद्धतीनं करते. छान गाजर, मटार, सोया सॉस वगैरे घालते, आवडेल तुला!“ ती म्हणाली, पण रॉकीला काहीच मान्य नव्हतं. शेवटी ताईनंच सुचवलं, आपल्या गावात जवळच एक उत्तम रेस्टॉरंट सुरू झालंय. आपण तिथेच जाऊया. रॉकीच्या मनात शंका होतीच, पण तरीही तिकडे जायला त्यानं तयारी दाखवली. दोघं तिथे पोहोचले. हॉटेलातली माणसं ताईच्या ओळखीची वाटत होती. ताईनं सुचवल्यावरून रॉकीनं तिथे व्हेज फ्राइड राइस ऑर्डर केला. दहा मिनिटांत तो हजर झाला. रॉकीनं पहिला घास घेतला आणि त्याला तो प्रचंड आवडला. आणखी एक डिश ऑर्डर करून तिचा फन्ना उडवल्यानंतर त्याचं समाधान झालं. दोघं रमतगमत घरी आले. “ताई, खरंच किती बदललं तुझं गाव! इथे एवढं चांगलं जेवण, एवढ्या सुधारणा झाल्या असतील, असं वाटलं नव्हतं मला!“ ताई हलकेच हसली. “तू आत्ता जे जेवलास, ते मीच तयार केलेलं होतं. माझंच हॉटेल आहे ते. आणि तेच बघायला तुला गावात बोलावलं होतं!“ ती शांतपणे म्हणाली आणि रॉकीला काय बोलावं सुचेना. त्याला त्याची चूक कळली होती. “झोप आता. उद्या तुला वेळ असला, तर गावातल्या बाकीच्या सुधारणा आपण बघून येऊ. बरं का, `राकेश!“ एवढंच बोलून ती आत जायला वळली.

how to make water funny viral video
एक ग्लास पाण्याची रेसिपी माहीत आहे का? हा व्हायरल Video पाहून जाणून घ्या; पोट धरून हसाल…
Veg Tawa Fry Bhaji Recipe In Marathi
हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत व्हेज तवा फ्राय भाजी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Tiger Save His Life From Crocodile By Using His Brain
VIDEO: वाघाने दाखवलं मगरीला अस्मान! तावडीतून असा सुटला की, मगरच तोंडावर आपटली! वाघाचा जबरदस्त कमबॅक एकदा बघाच
a drunkard was in jail started singing painful song
तुरुंगात कैद असलेल्या मद्यपीने गायलं सॅड गाणं, पोलिसांना हसू आवरेना; व्हिडीओ होतोय व्हायरल

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • २ वाट्या बासमती तांदूळ (शिजवलेले)
  • ४ – ५ चमचे तेल
  • २ कांदे
  • १ गाजर बारीक चिरून
  • १ ढोबळी मिरची बारीक चिरून
  • ४-५ श्रावण घेवड्याच्या शेंगा बारीक चिरून
  • पाव कप मटार,
  • ३ ते 4 लसूण पाकळ्या (बारीक तुकडे करणए)
  • अर्धा इंच आलं
  • ३ चमचे सोया सॉस
  • ३ चमचे विनेगर
  • १ चमचा काळी मिरी
  • मीठ

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • 4 ते 5 चमचे तेल गरम करावे
  • काळी मिरी आणि लसूण घालावे.
  • कांदा घालून सर्व 2 मिनिटे परतावा.
  • ढोबळी मिरची घालून परतावी.
  • त्यानंतर चिरलेल्या सर्व भाज्या घालाव्यात.
  • चवीसाठी मिठ घालून भाज्या वाफेवर शिजवाव्यात.
  • भाज्या शिजल्यावर सोया सॉस आणि विनेगर घालावे.
  • शिजवलेला तांदूळ घालून चांगले परतणे, मीठ आणि 2 चमचे तेल घालावे.
  • चांगले एकजीव झाल्यावर सर्व्ह करावे.
    (सोया सॉस मध्ये मीठ असल्यामुळे राईस करताना मीठ अंदाजाने घालावे)

[/one_third]

[/row]