दीपा पाटील
साहित्य
ल्ल साहित्य पाऊण किलो मटण, ४ कांदे, अर्धा कप किसलेला नारळ, १ चमचा खसखस, २-३ बडी वेलची, ५-६ हिरव्या वेलच्या, १ चक्रीफूल, ४-५ लवंगा, अर्धा चमचा जिरे, १ चमचा धने-जिरे पूड, १ चमचा बडीशेप, ५-६ सुक्या मिरच्या, २ चमचे आले-लसूण वाटून, मीठ.
कृती
कांदा चिरून घ्या. मटण नीट साफ करून घ्या.
कुकरमध्ये २ मोठे चमचे तेल गरम करा. त्यात बडी वेलची, हिरवी वेलची, लवंग आणि कांदा घालून परता. त्यात मटण घालून दीड कप पाणी ओता. आता कुकरचे झाकण लावून ५ दणदणीत शिट्टय़ा काढून घ्या. एका दुसऱ्या भांडय़ात १ चमचा तेल गरम करा. त्यात जिरे, धने, बडीशेप, मिरची, खसखस, खोबरे परतून घ्या. हे मिश्रण गार करून घ्या. त्यात पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या. आता मटण शिजलेले आहे, शिवाय मसाल्याचे वाटणही तयार आहे. हे वाटण दुसऱ्या मोठय़ा पातेल्यात घाला. त्यात मटण घालून पुन्हा १० मिनिटे शिजवून घ्या. वरून भरपूर कोथिंबीर घाला आणि भाताबरोबर ही हैद्राबादी मटण करी फस्त करा.
पाककृतीसाठी लागणारा वेळ :
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1
एकूण वेळ : 1
पदार्थाचा प्रकार :
किती व्यक्तींसाठी :
लेखक : Array
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2019 4:09 am