News Flash

न्यारी न्याहारी : इडली ढोकळा

इडलीसारखाच एक वेगळा आणि सोप्पा प्रकार इडली ढोकळा.

इडली तशी पौष्टिक असली तरी सतत खायला आवडत नाही. म्हणूनच इडलीसारखाच एक वेगळा आणि सोप्पा प्रकार इडली ढोकळा.

साहित्य – नेहमीचे इडलीचे पीठ, खोबऱ्याची चटणी, सॉस, चीझ, फोडणीसाठी तूप, मोहरी, हिंग, कढीलिंब, काळे तीळ, लाल सुक्या मिरच्या, उडीद डाळ.

कृती – खोलगट डब्यात तेल लावून प्रथम इडली पीठ पातळ पसरून थोडं उकडून घ्या. पाच मिनिटांनी ते बाहेर काढून त्यावर चीज, खोबऱ्याची चटणी किंवा सॉस जे आवडत असेल ते पसरून घ्या. आता यावर उरलेलं पीठ घालून नेहमीप्रमाणे उकडून घ्या. किंचित थंड झाल्यावर थाळ्यात उलटून घ्या. यावर थोडं पाणी शिंपडा.  तूप तापत ठेवा. त्यात मोहरी, हिंग, कढीलिंब, काळे तीळ, लाल सुक्या मिरच्या, उडीद डाळ हे सगळं करून चरचरीत फोडणी करा. ती थाळीतल्या ढोकळ्यावर घालून चौकोनी तुकडे करून गट्टम करा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 12:26 am

Web Title: idli dhokla recipe
Next Stories
1 सेल्फ सव्‍‌र्हिस : सायकल जपताना..
2 ताणमुक्तीची तान : छंद जोपासणे महत्त्वाचे..
3 नवलाई : ‘आयसन’चा पहिला अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही
Just Now!
X