X

न्यारी न्याहारी : झटपट सामोसे

मैदा आणि पाणी यांची पेस्ट करून घ्यावी. पोळीचे दोन भाग करावेत.

साहित्य – उरलेल्या घडीच्या पोळ्या, आवडेल त्याप्रमाणे सारण. हे सारण बटाटा, मटार उकडलेले असेल किंवा पनीर बुर्जी असेल, मका उकडून मॅश केलेले असेल. अगदी चाट मसाला वगैरे घालून उरलेली भाजी परतलीत तरी चालेल. फक्त हे सारण कोरडे हवे. मुख्य म्हणजे चटकदार असावे. मैदा आणि पाणी, तेल.

कृती – मैदा आणि पाणी यांची पेस्ट करून घ्यावी. पोळीचे दोन भाग करावेत. त्रिकोण करून त्यात वरचे सारण भरावे. त्याच्या सर्व कडा मैदा आणि पाण्याच्या पेस्टने चिकटवून घ्याव्या. तेल उकळायला ठेवावे आणि त्यात हे समोसे तळून घ्यावेत. अगदी समोशाचा आकार जमला नाही तर चक्क करंजीसारखा आकार देऊन चिकटवून तळावे.