‘मिसळ’ हा मराठी खाद्यसंस्कृतीतील असा एक पदार्थ आहे; जो प्रदेशानुसार आपली चव आणि रूप बदलतो. सकाळच्या न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही आणि कुणालाही खायला आवडणारा पदार्थ म्हणूनही तो अलीकडे नावारूपाला आलाय. पण मिसळ हा केवळ पदार्थ नसून त्या प्रदेशातील खवय्यांसाठी त्यांचा अभिमान असतो. कोल्हापूर, नाशिक किंवा नगरमधील ‘मिसळ’चे कट्टर चाहते तर मिसळीबद्दल बोलताना कधी कधी प्रेमापोटी आक्रमकही झालेले पाहायला मिळतात. अशीच एक अभिमान बाळगण्यासारखी आणि जरूर चाखावी अशी मिसळ मुंबईतही मिळते हे तुम्हाला ठाऊक आहे का? ‘मारुतीराव मिसळवाले’ या नावाने आणि ‘अस्सल मराठी चव’ या टॅगलाइनने ती मुंबईकरांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारुतीराव नागोजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी कमलाबाई यांनी १९८३ साली अहमदनगरच्या मुख्य पोस्ट ऑफिसजवळ एक उपाहारगृह सुरू केलं. त्या उपाहारगृहातील मुख्य पदार्थ होता मिसळ. अल्पावधीतच ही मिसळ नगरकरांच्या चर्चेचा विषय बनली. कारण या मिसळीचं वैशिष्टय़ म्हणजे मिसळीसोबत पाव नाही तर पुऱ्या दिल्या जात होत्या. स्वत:च्या शेतात पिकवलेल्या गव्हापासून तयार केलेलं पीठ पुरीसाठी वापरलं जात असे. त्यामध्ये कुठलीही भेसळ नसल्याने त्या गव्हाला एक वेगळी चव होती. त्यामुळे नगरकर ‘मिसळपाव’ या पारंपरिक जोडीला छेद देणाऱ्या नावीन्यपूर्ण ‘मिसळपुरी’ या संकल्पनेच्या प्रेमात पडले.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khao khushal article prashant nanaware
First published on: 25-08-2018 at 01:44 IST