06 August 2020

News Flash

नाताळ मेवा : खुसखुशीत वडे

सकाळी या रोटय़ांसाठी पीठ घातले जाते आणि त्यानंतर गावातील महिला रात्रभर जागून हे रोटय़ा काढत असतात

फ्रेडी डिकोस्टा-गोन्सालविस

नाताळ सणातील पारंपरिक पदार्थामधील एक प्रमुख पदार्थ म्हणजे वडे. लग्नाच्या आदल्या रात्री तांदळाच्या पिठापासून तयार केलेले वडे हे खास आकर्षण असते. नाताळ सणानिमित्त असे वडे घरोघरी बनवले जातात. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस वसईमध्ये ख्रिस्ती समाजामध्ये लग्नसराईला सुरुवात होते. लग्न समारंभानिमित्त वधू-वराच्या घरी तांदळांच्या पिठापासून बनवले जाणारे वडे काढून नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना वाटले जातात. या पदार्थाला रोटय़ा किंवा वडे म्हटले जाते.

सकाळी या रोटय़ांसाठी पीठ घातले जाते आणि त्यानंतर गावातील महिला रात्रभर जागून हे रोटय़ा काढत असतात. या महिलांचा आणि रोटय़ा काढण्याच्या कार्यक्रमाचा उत्साह वाढवण्यासाठी तरुण-तरुणी पारंपरिक वाद्य घुमटांवर लोकगीते गात मौजमजा करत असतात. लग्नसराईत मोठय़ा प्रमाणावर जरी वडे केले जात असले तरी घरीही अनेक जण हा पदार्थ बनवत असतात.

नाताळ सण म्हटला की समोर येतो तो केक. मात्र वसईच्या मराठमोळय़ा ख्रिस्ती समाजात नाताळ सणात अनेक पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. या पारंपरिक पदार्थाची ओळख आणि पाककृती

पाककृती

साहित्य :

तीन मोठय़ा वाटय़ा तांदळाचे जाडसर पीठ, २ मोठय़ा वाटय़ा उडीद डाळीचे पीठ, २ चमचे तेल, चवीनुसार मीठ, चिमूटभर इस्ट.

कृती :

प्रथम तांदळाचे जाडसर पीठ, उडीद डाळीचे पीठ, तेल, मीठ एका पातेल्यात एकत्र करून त्यामध्ये गरजेनुसार कोमट पाणी घालून एकजीव करण्यास सुरुवात करावी. हे पीठ खूप जास्त मऊसर होईस्तोवर ते मळून घ्यावे. (तळव्यावर वडय़ा थापता येतील एवढे मळून घ्यावे.) त्यानंतर त्यामध्ये थोडेसे इस्ट घालून हे पीठ साधारणत: ६ ते ७ तास बाजूला ठेवून द्यावे. इस्टमुळे हे पीठ वर आल्यानंतर कढईत तेल पूर्ण उकळवून घेणे आणि मग आपल्या तळव्यावर या पिठाच्या वडय़ा थापून त्या तेलात सोडाव्यात. हे वडय़ा तळव्यावर थापताना त्या जास्त मोठय़ा किंवा जाडय़ा थापू नये, अन्यथा त्या आतमध्ये चांगल्या प्रकारे शिजणार नाहीत. या वडय़ांना लालसर रंग आला म्हणजे आपल्या वडय़ा/ रोटय़ा तयार झाल्या असे समजावे. या रोटय़ा चहाबरोबर खाता येतात.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 12:01 am

Web Title: khuskhushit vade christmas recipes zws 70
Next Stories
1 डोंबिवलीत २२ वर्षीय तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू
2 उन्नत भावनांना आपलेसे केल्यास आयुष्य सुंदर!
3 पालघरमध्ये भूकंपाचा धक्का
Just Now!
X