X

न्यारी न्याहारी : मका इडली

सर्वात आधी फोडणीचे साहित्य वापरून कढईत दणदणीत फोडणी करावी.

साहित्य – १ वाटीभर मक्याचे पीठ (हे दुकानात मिळते. जाडसर असलेले उत्तम), पाव वाटी आंबट दही, २-३ चिमटी इनो, मीठ, साखर

फोडणीसाठी – मोहरी, हिंग, चणाडाळ, उडीदडाळ, कढीलिंब, किसलेले आले, तेल

कृती – सर्वात आधी फोडणीचे साहित्य वापरून कढईत दणदणीत फोडणी करावी. त्यात मक्याचे पीठ घालून पाच मिनिटे परतावे आणि बाजूला ठेवावे. हे थोडेसे निवले की त्यात दही, इनो, मीठ, साखर घालून ते इडलीच्या पिठाप्रमाणे कालवावे. नेहमीच्या पद्धतीने इडल्या लावाव्यात. आवडत असल्यास यात किसलेले कोबी किंवा गाजरही घालता येईल. पण ते फोडणीतच परतून घ्यावे.

Outbrain

Show comments