22 April 2019

News Flash

सकस सूप : मका सूप

 पहिल्यांदा मक्याचे दाणे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे.

(संग्रहित छायाचित्र)

 

साहित्य

– १ कप उकडलेले मक्याचे दाणे, ३ कप दूध, ४ छोटे चमचे मैदा, १ मध्यम कांदा, अडीच लहान चमचे अमूल बटर, चवीसाठी मीठ, मिरपूड.

कृती

  •  पहिल्यांदा मक्याचे दाणे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा. एका पातेल्यात बटर गरम करावे आणि त्यात कांदा घालून गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात मैदा घालावा आणि परत परतावे. त्यानंतर त्यात दूध घालावे आणि घट्ट होईपर्यंत ढवळावे. आता यात वाटलेले मक्याचे दाणे घालून मंद आचेवर ते उकळावे. लागल्यास थोडे पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ आणि मिरपूड घालावी.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on August 29, 2018 3:47 am

Web Title: maize soup recipe