18 October 2019

News Flash

टेस्टी टिफिन : बाजरी डोसा

बाजरी आणि उडीद डाळ दोन्ही वेगवेगळी भिजवावी. मेथी दाणे, जिरेही त्यात घालावे.

(संग्रहित छायाचित्र)

शुभा प्रभू साटम

अनेकांना हल्ली गहू खायचा नसतो. काहींना भात नको असतो. काहीजणांना भाकऱ्याच खायच्या असतात, पण मग त्या करता येत नाहीत. अशा वेळी या सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणारे हे सोप्पे डोसे.

साहित्य

साहित्य – १ वाटी बाजरी आणि १ वाटी उडीद डाळ, मेथी दाणे, जिरे.

कृती :

बाजरी आणि उडीद डाळ दोन्ही वेगवेगळी भिजवावी. मेथी दाणे, जिरेही त्यात घालावे. सहा तास भिजवल्यानंतर मऊ मुलायम वाटून घ्यावीत. त्यानंतर रात्रभर हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवून द्यावे. दुसऱ्या दिवशी त्या पिठात मीठ आणि आवडत असल्यास चिमूटभर साखर घालून डोसे करावेत.

हे डोसे नुसतेच चटणीसोबत खाता येतील नाहीतर करताना ऐनवेळी त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, गाजर, पालक, मेथी आदी भाज्या घालता येऊ शकतात. सोबतच चीज, ड्राय हब्र्ज, पावभाजी मसाला किंवा चाट मसालाही घालू शकता.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on March 22, 2019 12:07 am

Web Title: millet dosa recipe