05 August 2020

News Flash

पूर्णब्रह्म : मिनी हांडवा

तिळामध्ये तांबे, भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस चांगल्या प्रमाणात आहे.

मयूरा महाजनी

साहित्य

तांदूळ ३ वाटय़ा, उडीदडाळ १ वाटी, चणाडाळ अर्धी वाटी, मूगडाळ अर्धी वाटी, ज्वारी रवा १ वाटी (ऑप्शनल), याचे जाडसर पीठ दळून आणा. मिरची-लसूण पेस्ट १ चमचा, कांदा बारीक चिरून अर्धी वाटी, दुधी किसून १ वाटी, मेथी चिरून १ वाटी, लाल भोपळा किसून अर्धी वाटी, तीळ, ओवा, मीठ, फोडणीचे साहित्य.

कृती

दोन वाटय़ा जाडसर पिठात १ चमचा दही व पाणी घालून पीठ एकजीव करा व ४-६ तास झाकून ठेवा. पीठ आंबल्यावर यामध्ये सर्व भाज्या किसून किंवा बारीक चिरून घाला. चवीप्रमाणे मीठ, आले-लसूण-मिरची पेस्ट, हळद, थोडा गूळ घालून पुन्हा मिश्रण एकजीव करा. नॉनस्टिक पॅनमध्ये २ चमचे तेल घ्या. तेल तापले की त्यात मोहरी, तीळ, ओवा घाला. त्यावर  पीठ जाडसर पसरवा. यावर झाकण घालून मंद आचेवर वाफवू द्या. रंग बदलला की उलटून पुन्हा दुसरी बाजू थोडा वेळ होऊ  द्या. प्लेटमध्ये घेऊन त्याचे आवडीप्रमाणे काप करा. त्यावर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून वाढा. कांदा न घालता केल्यास २-३ दिवस टिकेल. धान्य, डाळ, भाज्या यामुळे परिपूर्ण आहार आहे. तिळामध्ये तांबे, भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस चांगल्या प्रमाणात आहे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 4:02 am

Web Title: mini handvo recipe for loksatta readers zws 70
Next Stories
1 मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग
2 पूर्णब्रह्म : हिरव्या मिरच्यांची आमटी
3 उपचारपद्धती : जल उपचार
Just Now!
X