18 October 2019

News Flash

आरोग्यदायी आहार : मुगाचे डोसे

अख्खे मूग, ज्वारी, ओवा एकत्र भाजून दळून आणावे.

मुगाचे डोसे

डॉ. सारिका सातव

साहित्य

अख्खे मूग (अर्धा किलो), ज्वारी (१ वाटी), ओवा (२ छोटे चमचे), बारीक किसलेल्या भाज्या, चवीनुसार मीठ, मिरची-आले-लसूण पेस्ट (अर्धा ते एक चमचा.)

कृती

* अख्खे मूग, ज्वारी, ओवा एकत्र भाजून दळून आणावे.

* दळलेले पीठ १-२ वाटय़ा घ्यावे. त्यात मिरची-आले-लसूण पेस्ट आणि पाणी घालून पातळ भिजवावे.

* मिश्रणातील गुठळ्या व्यवस्थित फोडून मिश्रण एकसंध करावे.

* सर्वात शेवटी मीठ घालावे.

* आवश्यकतेनुसार बारीक किसलेल्या भाज्या या मिश्रणात घालू शकता.

* मिश्रण नीट ढवळून नंतर तव्यावर घालून डोसे करावेत. हे डोसे कोथिंबीर किंवा लसणाच्या चटणीबरोबर किंवा दह्य़ाबरोबर वाढावेत.

वैशिष्टय़े

* सर्व वयोगटांसाठी उपयुक्त.

* डब्यात नेण्यास उत्तम.

* मधुमेह, हृदयविकार, पित्ताचे विकार, स्थूलता इत्यादी अनेक व्याधींमध्ये उपयुक्त.

* पचनाच्या तक्रारी असणाऱ्यांसाठी उत्तम.

* ब जीवनसत्त्व, प्रथिने, तंतुमय पदार्थ अधिक प्रमाणात.

* अतिशय कमी वेळात होणारा पौष्टिक पदार्थ.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on March 5, 2019 4:11 am

Web Title: moong dosa recipe in marathi for loksatta readers