ज्योती चौधरी-मलिक

साहित्य

६ मटण चॉप, २ अंडी, अर्धी वाटी रवा, १ इंच आले, ७/८ लसूण पाकळ्या, १ वाटी कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या, ३ चमचे तेल, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, चवीपुरते मीठ.

कृती 

प्रथम चॉपना हळद-मीठ लावून वाफवून घ्या. आले, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या एकत्र वाटून त्याची पेस्ट करून घ्या. त्यात लाल तिखट आणि थोडे मीठ घालून चॉपना पेस्ट लावून साधारण एक तास ठेवा. नंतर एका बाऊलमध्ये अंडी फोडून फेसून घ्या. त्यात चवीपुरते मीठ घाला. गॅसवर पॅन गरम करा. त्यात तेल घाला. यानंतर मसाला माखलेला प्रत्येक चॉप पहिल्यांदा फेसलेल्या अंडय़ामध्ये बुडवा आणि नंतर वर रवा लावून तेलामध्ये छान तळून घ्या. हे गरमागरम आणि कुरकुरीत मटण चॉप फटाफट फस्त होतात.