19 February 2020

News Flash

स्वादिष्ट सामिष : मटण विंदालू

सर्वप्रथम मटण स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे.

दीपा पाटील

साहित्य

५०० ग्रॅम मटण, १०-१२ लाल सुक्या मिरच्या, १ चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, ७-८ काळी मिरी, लसूण, आले, २ मोठे चमचे ब्राऊन व्हिनेगर, १ मोठा कांदा (बारीक चिरलेला), मीठ.

कृती

सर्वप्रथम मटण स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. एका भांडय़ात जिरे, लाल मिरच्या, काळी मिरी परतून घ्यावे. यानंतर त्यात लसूण, आले, व्हिनेगार, मीठ घालून बारीक पेस्ट बनवावी. ही पेस्ट मटणाला लावून २ तास मुरत ठेवावे. आता कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात हे मुरवलेले मटण परतावे.

त्यात पाणी घालून त्याच्या २-३ शिट्टय़ा काढाव्या. यानंतर गॅस बंद करून अर्धा तास तसेच ठेवावे. नंतर एका बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर पेरून गरमागरम भातासोबत फस्त करा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on April 24, 2019 3:28 am

Web Title: mutton vindaloo recipe loksatta readers
Next Stories
1 ‘ई धूम्रपान’ आरोग्याला हानीकारकच!
2 काळजी उतारवयातली : मूत्रपिंड विकाराचे निदान नि उपचार
3 घरचा आयुर्वेद : मलावरोधाचा त्रास
Just Now!
X