X

पौष्टिक गोड सँडविच

सगळ्यात आधी खजूर, अंजीर, मनुका यांचे बारीक तुकडे करून घ्या.

साहित्य –

खजूर, अंजीर, मनुका, अक्रोड, बदाम, जॅम, ब्रेड, बटर.

कृती –

सगळ्यात आधी खजूर, अंजीर, मनुका यांचे बारीक तुकडे करून घ्या. अक्रोड, बदाम किंचित भाजून जाडसर भुगा करून घ्या. नेहमीप्रमाणे ब्रेडला बटर आणि जॅम लावून घ्या. त्यावर हा सुका मेवा पसरा आणि त्याचे सँडविच बनवा. यामध्ये आवडत असेल तर जॅमऐवजी मधही वापरता येईल. सुके किवी, जर्दाळू, पिच यांचाही वापर करू शकता.

Outbrain

Show comments