09 August 2020

News Flash

पूर्णब्रह्म : पालक पनीर

सर्वप्रथम १ कप पाण्यात पालक २ मिनिटे शिजवून घ्या, पालक थंड झाल्यानंतर ब्लेंडरमध्ये पेस्ट तयार करा.

डॉ. मानसी पाटील

साहित्य

४ कप पालक, २५० ग्रॅ. टोफू, १ चमचा जिरे, २ मध्यम चिरलेले कांदे, २ चमचा आले पेस्ट, २ चमचा लसूण पेस्ट, २  उकडलेले टोमॅटो, २ चमचा कोथिंबीर, १ चमचा जिरे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, १ मोठा चमचा नारळाचे दूध, ३ मोठे चमचे नारळ तेल, मीठ, चवीनुसार

कृती

सर्वप्रथम १ कप पाण्यात पालक २ मिनिटे शिजवून घ्या, पालक थंड झाल्यानंतर ब्लेंडरमध्ये पेस्ट तयार करा. त्याच प्रमाणे टोमॅटोची पेस्ट तयार करा. टोफूचे क्यूब्स करा, कढईत तेल गरम करून त्यात जिऱ्याची फोडणी द्या. त्यात कांदे घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता. नंतर आले-लसूण पेस्ट घालून परता. टोमॅटो पेस्ट, मसाले, मीठ घालून मध्यम गॅस वर ५ मिनिटे शिजू द्या. त्यात पालक पेस्ट आणि टोफू घालून मध्यम आचेवर उकळी येऊ  द्या. पाणी कमी असल्यास त्यात पाणी घाला. शेवटी नारळाचे दूध घालून खायला द्या.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2020 2:20 am

Web Title: palak paneer recipe how to make palak paneer zws 70
Next Stories
1 कोड समज-गैरसमज
2 सौंदर्यभान : बोटय़ुलिनम टॉक्सिन
3 नियोजन आहाराचे : मुलींच्या सुदृढ शरीरासाठी
Just Now!
X