News Flash

खाद्यवारसा : पातोळ्या

गरम गरम पातोळ्यांवर तूप घालून वाढा.

साहित्य  : तांदळाचे पीठ, पाणी, ओल्या नारळाचा किस, गूळ एक प्रत्येकी एक वाटी, हळदीची पाने, वेलची पूड, मीठ आणि तूप.

कृती : ओल्या नारळाचा किस, गूळ, वेलची एकत्र शिजवून मोदकात घालतात तसे सारण करून घ्या.

  • सारण शिजेपर्यंत पाणी उकळवून घ्या. त्यात तूप आणि मीठ टाका. उकळत्या पाण्यात तांदळाचे पीठ टाकून उकड काढून घ्या.
  • उकड थोडीशी थंड झाल्यावर ती व्यवस्थित माळून घ्या.
  • हळदीच्या पानाला थोडे तूप किंवा पाणी लावून त्यावर उकडीचा पातळ थर पसरवा.
  • पानाच्या एका बाजूवर सारण पसरवा आणि पान दुमडून ठेवा.
  • सर्व पाने तयार झाल्यावर मोदक उकडतात त्याप्रमाणे उकडवून घ्या.
  • गरम गरम पातोळ्यांवर तूप घालून वाढा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2018 12:44 am

Web Title: patolya recipe
Next Stories
1 शहरशेती : कवठी चाफा
2 दोन दिवसभटकंतीचे : भंडारदरा
3 फेकन्युज : रेड्डी शाकाहारीच..
Just Now!
X