23 September 2020

News Flash

आरोग्यदायी आहार : उत्तप्पम पिझ्झा

तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून (चार ते पाच तास) वेगवेगळे वाटून घ्यावे.

उत्तप्पम पिझ्झा

डॉ. सारिका सातव

सामग्री

* दोन वाटी तांदूळ, एक वाटी उडीद डाळ, पाव वाटी दही, एक वाटी बारीक चिरलेली कोिथबीर, एक वाटी बारीक चिरलेला कांदा, एक वाटी बारीक चिरलेले टोमॅटो, ३० ग्रॅम बारीक चुरा केलेले पनीर, चवीनुसार मीठ, तिखट किंवा हिरवी मिरची.

कृती

*  तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून (चार ते पाच तास) वेगवेगळे वाटून घ्यावे. थोडे दही टाकून रात्रभर एकत्र मिसळून ठेवावे.

*  या मिश्रणामध्ये सकाळी चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून एकत्र करावे किंवा उत्तप्पा करताना वरूनही टाकू शकतो.

*  उत्तप्पा तयार करून घ्यावा. (थोडा जाडसर)

बारीक चुरा केलेले पनीर त्यावर भुरभुरावे.किंचित कडक होऊ द्यावे.  त्यानंतर सुरीने पिझ्झाप्रमाणे त्याचे आठ त्रिकोण करावेत.

*  चटणीबरोबर खाण्यास द्यावे.

वैशिष्टय़े

* लहान मुलांसाठी उत्तम नाश्त्याचा, डब्यामधील पदार्थ.

*  चांगल्या प्रतीची कबरेदके, प्रथिने, ब जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळतात.

* मिश्रणात इतर भाज्याही मिसळू शकता.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 12:05 am

Web Title: pizza uttapam recipe
Next Stories
1 योगस्नेह : वृक्षासन
2 रोड ट्रिपवर जाताना..
3 नवं काय? : बदलते दिवे
Just Now!
X