16 January 2021

News Flash

कोलंबी कैरी रसगोळी आमटी

ही आमटी जेवढी मुरेल तेवढी उत्कृष्ट लागते. कैरीचे प्रमाण तिच्या आंबटपणानुसार ठरवा.

– शुभा प्रभू-साटम

साहित्य

कोलंबी १ वाटी सोलून (मध्यम आकाराची) दोर काढून धुऊन हळद व मीठ लावून, नारळाचे दूध १ मोठी वाटी (घट्ट हवे), ओलं खोबरं पाव वाटी छोटी, १ छोटा कांदा (४ पाकळ्या), कैरी छोटी तासून पातळ फोडी करून, धणे १०-१२ दाणे, काळी मिरी ५-६ दाणे, सुक्या मिरच्या ५-६ आवडीप्रमाणे, हळद, मीठ, तेल.

कृती

ओलं खोबरं, धणे, मिरी, सुक्या मिरच्या, ४ पाकळ्या कांदा, हळद सर्व अगदी गुळगुळीत वाटून घ्या. कढईत तेल तापवून त्यात किंचित िहग घालून त्यावर कोलंबी घाला. मंद आगीवर परतून चिरलेली कैरी घालून पाच मिनिटे परता. यात वाटलेलं खोबरं, मसाला घालून मंद आगीवर परता आणि कोलंबी जेमतेम बुडेल इतपत कोमट पाणी घालून वाफ काढा. आता यात नारळाचं घट्ट दूध घालून ढवळून मीठ हवं तसं घालून छोटीशी उकळी घ्या. फार उकळू नये. आमटी फुटू  शकते (नारळाचे चोथा पाणी होते) झाकण ठेवा. ही आमटी जेवढी मुरेल तेवढी उत्कृष्ट लागते. कैरीचे प्रमाण तिच्या आंबटपणानुसार ठरवा.

टीप – नारळाच्या दाट रसातली ही कोलंबीची आमटी त्यातील कैरीमुळे चविष्ट लागते.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 4:06 am

Web Title: prawns in raw mango curry recipe in marathi zws 70
Next Stories
1 नेक्सझू मोबिलिटीची ‘ई सायकल’
2 ‘मिशन ग्रीन कार’
3 ट्रॅफिक सेन्स..
Just Now!
X