शेफ नीलेश लिमये
राजगिरा हे एक सुपर फूड आहे. यामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म आहेत. म्हणूनच आज मी बनवलं आहे, राजगिऱ्याचं सॅलड.
साहित्य
* १ वाटी राजगिऱ्याच्या लाह्य़ा,
* १ कप दूध,
* २ चमचे साय,
* १ चमचा मध,
* मोसंबी,
* केळी,
* चिक्कू,
* चेरी,
* अक्रोड,
* पिस्ते.
कृती :
सगळ्यात आधी दूध गरम करून घ्या. कोमट होईपर्यंत बाजूला ठेवा. फळं सोलून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. राजगिऱ्याच्या लाह्य़ा फळांसोबत मिसळून घ्या. त्यामध्ये अक्रोड आणि पिस्ते, चेरीजसुद्धा घाला. आता दूध, साय आणि मध छान एकजीव करून घ्या. हे मिश्रण फळं आणि राजगिऱ्याच्या मिश्रणावर ओता. थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंडगार खा!
nilesh@chefneel.com
पाककृतीसाठी लागणारा वेळ :
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1
एकूण वेळ : 1
पदार्थाचा प्रकार :
किती व्यक्तींसाठी :
लेखक : Array
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 6, 2018 3:42 am