17 November 2019

News Flash

टेस्टी टिफिन : रताळ्याची खीर

रताळी उकडून, सोलून आणि किसून घ्या. तुपावर काजू, बदाम, मनुका थोडय़ाशा लालसर रंगावर परता आणि बाजूला काढून ठेवा

(संग्रहित छायाचित्र)

 शुभा प्रभू साटम

साहित्य :

* रताळी

* तूप

* काजू

* बदाम

* मनुका

* नारळाचे दूध किंवा साधे दूध

* गूळ.

कृती

रताळी उकडून, सोलून आणि किसून घ्या. तुपावर काजू, बदाम, मनुका थोडय़ाशा लालसर रंगावर परता आणि बाजूला काढून ठेवा. याच तुपात रताळ्याचा कीस घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर त्यात नारळाचे दूध किंवा साधे दूध घाला. गूळ घालून चांगले ढवळून घ्या. एक उकळी आल्यावर काजू, बदाम, मनुका घाला. पुन्हा एक उकळी आणून आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ करा. गुळाऐवजी तुम्ही खजुराचा वापर करून माफक गोड खीरही तयार करू शकता. खजूर घालायचा झाल्यास तो तुपात परतून कुस्करून दुधात घाला.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on August 16, 2019 12:10 am

Web Title: ratalyachi khir recipe abn 97