परदेशी पक्वान्न : नीलेश लिमये

या वर्षीच्या परदेशी पक्वान्न या सदरातील आजची शेवटची पाककृती. आपल्यातले बरेच जण दरवर्षी व्यायामशाळेत जाण्याचा, थोडाफार व्यायाम करण्याचा संकल्प करतातच; तर अशा साऱ्यांसाठी ही एक छानशी पाककृती. या पाककृतीमध्ये चॉकलेटही आहे, पण अवाकाडोही आहे. त्यामुळे पौष्टिक आणि चवदार अशा दोन्हींचा संगम साधला गेला आहे.

साहित्य

२ अवाकाडो,  १०० ग्रॅम कोको पूड, १०० ग्रॅम डार्क चॉकलेट, ३ मोठे चमचे दूध, चवीपुरते मीठ, २०-३० ग्रॅम मध (गोडाच्या आवडीनुसार कमीजास्त करता येईल), व्हॅनिलाचा स्वाद

कृती

अवाकाडोचा गर काढून घ्या. आता सर्व पदार्थ एकत्र करून फेटून घ्या. ज्या वाटीत किंवा भांडय़ातून खायला घ्यायचे आहे, त्यात ते ओतून तासभर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. तासाभरानंतर पाहा, तुमचे अवाकाडो चॉकलेट मूस तयार आहे.

nilesh@chefneel.com