14 November 2019

News Flash

 रशियन चिकन कबाब

चिकन नीट धुऊन त्याला मीठ, आले-लसूण, हिरवी मिरची लावून थोडय़ाशा पाण्यात ते शिजवून घ्यावे.

(स्वादिष्ट सामिष  : दीपा पाटील)

साहित्य

  • अर्धा किलो बोनलेस चिकन, २ उकडलेले बटाटे, १ कांदा, १ गाजर, अर्धा कप चिरलेली कोबी, १ भोपळी मिरची, १ चमचा आले लसूण वाटण, १० हिरव्या मिरच्या, दीड कप चिरलेली कोथिंबीर, २ चमचे मैदा, अर्धा कप प्रोसेस्ड चीझ, अर्धा कप मोझेरेला चीझ, २ कप कच्ची शेव, २ अंडी, मिरपूड, मीठ, तेल.

कृती :

चिकन नीट धुऊन त्याला मीठ, आले-लसूण, हिरवी मिरची लावून थोडय़ाशा पाण्यात ते शिजवून घ्यावे. नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करावे. उकडलेले बटाटे किसून घ्यावे. गाजरही किसून घ्यावे. कांदा, बटाटा, भोपळी मिरची बारीक चिरून घ्यावे. आता बटाटे, गाजर, चिकन, कांदा, भोपळी मिरची, कोबी, कोथिंबीर, मिरपूड, चीझ, मीठ घालून चांगले मळून घ्यावे. या मिश्रणाचे लांबट गोळे करून त्याचे कबाब बनवावे. अंडी फोटून फेटून घ्यावी. या फेटलेल्या अंडय़ात हे कबाब बुडवून त्यानंतर कच्च्या शेवेमध्ये घोळवून गरम तेलात गुलाबी रंग येईपर्यंत तळावे. गरम गरम सॉस आणि मेयोनिझबरोबर हे रशियन कबाब खायला घ्यावेत.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on September 4, 2019 5:19 am

Web Title: russian chicken kabab food recipe akp 94