- शुभा प्रभू साटम साहित्य : * अर्धी वाटी साबुदाणा, * १ वाटी इडलीचा रवा, * पाव वाटी गोड दही, * साखर, * मीठ. कृती * साबुदाणा, इडली रवा आणि दही एकत्र करा. * त्यात किंचिंत साखर आणि मीठ घालून रात्रभर भिजवून ठेवा. * दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मिश्रण ढवळून त्याच्या इडल्या करा. * हवे असल्यास अधिक पाणी घालून घ्या. * नेहमीच्या इडलीला कंटाळला असाल तर हा वेगळा प्रयोग नक्की करून पाहा.