डॉ. सारिका सातव

साहित्य

* जव (बार्ली) – १ वाटी, रवा- १ वाटी, दही- १ वाटी, चवीपुरते मीठ, फ्रूट सॉल्ट- अर्धा चमचा, कोथिंबीर- पुदिना- फुटाण्याची डाळ- मिरची (चटणीसाठी)

कृती

बार्ली (जव) पाण्यात धुऊन रात्रभर भिजवावे. सकाळी मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.

वाटलेले मिश्रण आणि रवा, दही एकत्र करून ठेवावे.

आवश्यकतेनुसार पाणी मिसळावे.

चवीनुसार मीठ मिसळून नंतर फ्रूट सॉल्ट टाकावे.

या मिश्रणाच्या इडलीपात्रातून इडली बनवून घ्याव्यात.

कोथिंबीर, पुदिना, फुटाण्याची डाळ, मिरची एकत्र वाटून चटणी बनवावी.

या चटणीसोबत इडली खाण्यास द्यावी.

वैशिष्टय़े

* तेलाचा वापर अत्यंत कमी. त्यामुळे हृदयविकार, मधुमेह, स्थूलता या विकारांमध्ये उपयुक्त

*  आवडीच्या भाज्या यात मिसळू शकता.

*  सर्व वयासाठी उपयुक्त

*  प्रथिने, तंतुमय पदार्थ, ब जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात.

*  सूज असणाऱ्यांसाठी बार्ली अतिशय उपयुक्त आहे.