News Flash

मस्त मॉकटेल : स्ट्रॉबेरी मार्गारिटा

स्ट्रॉबेरीज, संत्र्याचा रस, सोडा, लिंबूरस आणि बर्फ ब्लेंडरमध्ये घाला. ते ब्लेंडरमधून जाडसर वाटून घ्या.

(संग्रहित छायाचित्र)

साहित्य

अर्धा किलो ताज्या स्ट्रॉबेरी, अर्धा कप संत्र्याचा रस, अर्धा कप सोडा, पाव कप लिंबूरस, अर्धा कप बर्फ, सजावटीसाठी लिंबू, जाडसर पिठीसाखर.

कृती

स्ट्रॉबेरीज, संत्र्याचा रस, सोडा, लिंबूरस आणि बर्फ ब्लेंडरमध्ये घाला. ते ब्लेंडरमधून जाडसर वाटून घ्या. आता ग्लासाच्या कडेवर लिंबाची फोड फिरवून घ्या. लिंबाने ओल्या झालेल्या ग्लासाच्या या कडेवर जाडसर पिठीसाखर पेरा. आता ग्लासाच्या कडेला या साखरेचा छान थर तयार होईल. या ग्लासात स्ट्रॉबेरीचे मिश्रण ओता. सजावटीसाठी लिंबाची चकती लावून तुमची स्ट्रॉबेरी मार्गारिटा पेश करा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:15 am

Web Title: strawberry margarita recipe
Next Stories
1 उन्हातील गारवा
2 ट्रिपटिप्स : जंगल भटकंती
3 कोडाईकनालचे चीज आणि चॉकलेट्स
Just Now!
X