17 February 2020

News Flash

टेस्टी टिफिन : रताळ्याचे पॅनकेक

कोवळी रताळी सोलून किसून घ्यावीत. त्यामध्ये कणिक, दूध आणि पाणी घालून पातळसर मिश्रण करावे

(संग्रहित छायाचित्र)

 शुभा प्रभू साटम

साहित्य :

*  कोवळी रताळी

*  कणिक

*  दूध

*  पाणी

*  गूळ

*  तूप.

कृती

कृती – कोवळी रताळी सोलून किसून घ्यावीत. त्यामध्ये कणिक, दूध आणि पाणी घालून पातळसर मिश्रण करावे. या मिश्रणात किसलेला गूळ घालावा. रताळी गोड असल्याने तशी तर त्याची फारशी गरज नाही, तरीही गोड जास्त आवडत असल्यास गूळ घालावा. पाच-दहा मिनिटे हे मिश्रण मुरू द्यावे. यानंतर तव्यावर तूप घालून त्याची छोटी छोटी धिरडी काढून घ्यावी. या पॅनकेक्सचा आकार अगदी सुबक येत नाही, पण खायला मात्र छान लागतात.

कणिक वापरायची नसेल तर मैदा, ज्वारी, बाजरी, नाचणी यापैकी कोणतेही पीठ तुम्ही वापरू शकता. गुळाऐवजी साखरही वापरता येईल.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on July 19, 2019 12:13 am

Web Title: sweet potato pancakes recipe abn 97
Next Stories
1 शहरशेती : उपयुक्त भाज्या
2 परदेशातला ‘घरोबा’
3 घरातलं विज्ञान : कपडय़ावरचे डाग जातात कसे?
Just Now!
X