X

सॅलड सदाबहार : रताळ्याचे सॅलड

रताळ्याचा किस ब्लांच करताना पाण्यात २ चमचे व्हिनेगर किंवा अध्र्या लिंबाचा रस घालावा म्हणजे रताळे शुभ्र दिसेल.

शेफ नीलेश लिमये

साहित्य

*  मध्यम आकाराची २-३ रताळी, शेंगदाण्याचे कूट २ चमचे, १-२ हिरव्या मिरच्या, सैंधव मीठ, मिरपूड, कोथिंबीर, राजगिऱ्याच्या लाह्य़ा २ चमचे.

कृती

रताळे किसून घ्या. हा कीस उकळत्या पाण्यातून ब्लांच करून घ्या. (३० सेकंद वाफवून घ्या आणि मग पटकन बाहेर काढून थंड करून घ्या.) यामध्ये दाण्याचे कूट, सैंधव मीठ मिसळून घ्या. एका मोठय़ा बशीत हे मिश्रण घ्या. वरून मिरपूड, कोथिंबीर आणि राजगिऱ्याच्या लाह्य़ा घालून सजवा. हे सॅलड उपवासालाही चालू शकेल.

रताळ्याचा किस ब्लांच करताना पाण्यात २ चमचे व्हिनेगर किंवा अध्र्या लिंबाचा रस घालावा म्हणजे रताळे शुभ्र दिसेल. काळे पडणार नाही. हाच किस वाफवून डीप फ्राय करून क्रिस्पी नूडल भेळप्रमाणे क्रिस्पी रताळ्याची भेळही करता येईल.

nilesh@chefneel.com

First Published on: August 18, 2018 1:43 am