शुभा प्रभू साटम

रोज डब्यात काय नवीन द्यावं, न्यावं असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो. पटकन करता आणि खाता येतील अशा पदार्थाच्या शोधात सर्वच जण असतात. त्यांचा शोध संपवणारं हे नवं सदर..

साहित्य

१ वाटीभर ब्रेडचे तुकडे, बेसन आणि नाचणी पीठ पाव वाटी, दही, मीठ, साखर, तेल, चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची.

कृती

मिक्सरमधून ब्रेडचा जाडसर भुगा करून घ्यावा. त्यात बेसन, नाचणीचे पीठ टाकावे. दही, मीठ, साखर आणि पाणी घालून सरसरीत करून दहा मिनिटे मुरण्यासाठी ठेवावे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची याच पिठात एकत्र करून घ्यावे. हवा असल्यास बारीक रवाही घालता येईल. यानंतर तव्यावर तेल घालून त्यावर उत्तप्पे काढावेत. आवडत असल्यास आणि उपलब्ध असल्यास उत्तप्प्यामध्ये टोमॅटो, सिमला मिरची, पालक, मेथी बारीक चिरून घालता येईल. तसेच उकडलेले मक्याचे दाणेही घालता येतील.