27 October 2020

News Flash

खाद्यवारसा : टोमॅटोचे पिठले

कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईत तेल तापायला ठेवा. त्यात मोहरी, हिंग घालून कांदा परता.

(संग्रहित छायाचित्र)

ज्योती चौधरी-मलिक

साहित्य

अर्धा किलो टोमॅटो (मात्र हे सुकलेले, जुने नकोत. ते छान लाल आणि चवीला आंबटगोड असणारे गावरान टोमॅटो असतील तर उत्तम.) २ मोठे कांदे, २ चमचे तेल, १ वाटी बेसन, ३-४ हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, १ चमचा मोहरी, १ चमचा तिखट, चिमूटभर हिंग, चवीनुसार साखर, मीठ.

कृती –

कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईत तेल तापायला ठेवा. त्यात मोहरी, हिंग घालून कांदा परता. तो पारदर्शक झाल्यानंतर आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. आता यात हळद, तिखट, मीठ घाला. चवीनुसार मीठ, साखर घाला. यानंतर त्यात चिरलेले टोमॅटो घालून १०-१२ मिनिटे शिजवा. टोमॅटो छान मंद आचेवर शिजायला हवेत. शिजण्यासाठी अजिबात पाणी घालू नका. यानंतर या मिश्रणाला गरजेनुसार बेसन लावावे. आपल्याला हवे त्याप्रमाणे म्हणजे पातळसर किंवा जाडसर. बेसन लावणे म्हणजे हळूहळू त्या टोमॅटोच्या मिश्रणात मावेल एवढे बेसन पीठ पेरत जाणे. या वेळी सतत हे पिठले चमच्याने हलवत राहा, म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाहीत. यानंतर २-३ मिनिटे झाकून ठेवा आणि एक दमदमीत वाफ काढा. वरून कोथिंबिरीची पखरण करा. फुलके किंवा भाताबरोबर खा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 3:57 am

Web Title: tomato pitla recipe
Next Stories
1 शहरशेती : वेलभाज्यांची काळजी
2 सुंदर माझं घर : बिया, टरफलांची शुभेच्छापत्रे
3 ऑनलाइन मनोरंजन
Just Now!
X