शुभा प्रभू-साटम

कधीतरी उपमा जास्त होतो आणि उरतो. मग तो गारगुट्ट उपमा कोणीच खात नाही. काही वेळा ताजा उपमाही उरतो. कारण तो दडदडीत किंवा घट्ट होतो जो अजिबात खाववत नाही. अशा वेळी हा उपमा फुकट घालवण्यापेक्षा त्यापासून एक भन्नाट नाश्त्याचा पदार्थ बनवला तर? आज हेच उपमा कटलेट.

साहित्य – उरलेला उपमा १ वाटी (त्यात काजू असतील तर काढून टाका.)उकडलेला आणि किसलेला बटाटा अर्धी वाटी, चाट मसाला ,आवडीप्रमाणे तिखट, थोडा ओवा, मीठ, साखर.

कृती – सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. लक्षात ठेवा मिश्रण पातळ नको तर घट्ट हवं. त्याचे छोटे छोटे गोळे अथवा टिक्की करून आवडीप्रमाणे तळून किंवा भाजून घ्याव्या. याच्या टिक्की किंवा कटलेट नीट वळता येत नसतील तर अर्धा तास ते मिश्रण फ्रिजमध्ये उघडे ठेवावे.