News Flash

आरोग्यदायी आहार : ओल्या हळदीचे लोणचे

ओली हळद स्वच्छ धुऊन साल काढून त्याचे तुकडे करावे.

डॉ. सारिका सातव

साहित्य

*  ओली हळद- एक वाटी (कापून)

*   आले- अर्धा वाटी (कापून)

*   हिरवी मिरची- अर्धा वाटी

*   लिंबू रस- अर्धा वाटी

*   मीठ- चवीपुरते

*   मोहरी- एक मोठा चमचा

*   मेथी दाणे – अर्धा चमचा

*   मोहरी तेल, लोणचे मसाला

कृती-

*   ओली हळद स्वच्छ धुऊन साल काढून त्याचे तुकडे करावे. * त्याचप्रमाणे आलेसुद्धा स्वच्छ धुऊन साल काढून त्याचे तुकडे करून घ्यावे. * हिरवी मिरची बारीक कापून घ्यावी. * बारीक केलेली हळद, आले व मिरची एकत्र करून मीठ, लिंबूरस टाकून मिसळावे. * भाजलेली मोहरी व मेथीदाणे यांची जाडसर पावडर करावी. *  तेल तापवून थंड करावे. *  चवीप्रमाणे लोणचे मसाला मिळसून इतर सर्व मिश्रणात हे मिसळावे. * काचेची बरणी थोडी तापवून हे मिश्रण नंतर त्यात भरावे. * झाकण घट्ट लावून साते ते आठ दिवस उन्हात ठेवावे.

वैशिष्टय़े

* थंडीत खाण्यासाठी उपयुक्त.

भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, मधुमेह, अपचन, बद्धकोष्ठता या विकारांवर या पदार्थाचा उपयोग होतो.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 3:40 am

Web Title: wet turmeric pickle recipe zws 70
Next Stories
1 ‘बीएस ६’ ला पसंती
2 ओकिनावाची विजेवर चालणारी ‘लाइट’
3 व्हिंटेज वॉर : फोर्ड वर्सेस फेरारीचा खरा नायक
Just Now!
X