05 August 2020

News Flash

पूर्णब्रह्म : पांढरा वाटाणा रस्सा

पांढरे वाटाणे ५-६ तास भिजत घाला. वाटाणे बुडतील एवढे पाणी व चवीनुसार मीठ घालून कुकरमध्ये शिजून घ्या.

रचना पाटील

साहित्य

१ वाटी पांढरे वाटाणे, २ किसलेले कांदे, अर्धी वाटी मिक्सरमध्ये बारीक केलेले काजू , १ वाटी नारळाचे दूध, २ मोठे चमचे आलं-लसूण वाटण, ६ लवंग, २ दालचिनी तुकडे, ६ पांढरी मिरी, मीठ चवीनुसार, १ मोठा चमचा तेल.

कृती

पांढरे वाटाणे ५-६ तास भिजत घाला. वाटाणे बुडतील एवढे पाणी व चवीनुसार मीठ घालून कुकरमध्ये शिजून घ्या. कढईत तेल टाकून लवंग-दालचिनी-मिरी टाका. तडतडल्यावर किसलेले कांदे टाकून परता. मग आलं-लसूण वाटण टाकून पुन्हा परता. त्यात शिजलेले वाटाणे टाका. चवीनुसार मीठ टाका. त्यात काजू पेस्ट, नारळाचे दूध टाका. उकळी येऊ द्या.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2020 2:17 am

Web Title: white peas gravy recipe zws 70
Next Stories
1 उदयगिरी-खंडगिरी
2 मुंडी डाळ
3 बलून लॅम्पशेड
Just Now!
X