Aamras: उन्हाळा म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर आंबा येतो. कोकणी माणसांसाठी आंबा म्हणजे जीव की प्राण. भर उन्हाळ्यात दुपारी गावाकडचे आंबे खाण्याची मजा काही औरच असते. या काळावधीमध्ये लहान मुलांना सुट्टी असते. शिवाय लग्नसमारंभ देखील असतात. त्यामुळे जेवणाच्या वेळी सर्वजण एकत्र असतात. अशा वेळी आंबे खाण्यात जास्त आनंद मिळतो. घरातील सर्वांना आंबे खायला मिळावेत म्हणून लोक आंबे डझनच्या भावात न घेता, आंब्याची सबंध पेटीच खरेदी करतात. काहींना आंबे सोलून खायला आवडतात. काही कापून आंबे खातात. तर काही लोक त्याच्यापासून आमरस, आम्रखंड, आंब्याची वडी असे पदार्थ तयार करुन खातात.

आंब्यापासून तयार केला जाणारा सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे आमरस असे आपल्याकडे मानले जाते. बऱ्याचजणांकडे उन्हाळ्यात घरी आंबे आणले की त्यातील थोड्या आंब्यांपासून आमरस तयार करुन खाल्ला जातो. सणवाराला पुरीबरोबर आमरसाची वाटी हमखास पाहायला मिळते. महागड्या आंब्यापासून तयार केलेला हा आमरस लगेच खाणे योग्य मानले जाते. पण काही वेळेस आमरस जास्त प्रमाणात तयार केल्यावर तो साठवून ठेवावा लागतो. आमरस बनवताना किंवा साठवून ठेवताना केलेल्या चुकांमुळे तो काळा पडून खराब होण्याची शक्यता असते. असे झाल्यास आंबे खरेदी करण्यासाठी खर्च केलेले पैसे, आमरस बनवताना लागलेला वेळ आणि मेहनत सर्वकाही वाया जाऊ शकते.

MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Perfect 7 Times To Drink Water In 24 Hours
दिवसभरात पाणी पिण्यासाठी ‘या’ ७ वेळा आहेत परफेक्ट! २४ तासांत कधी पाणी प्यावं? वाचा फायदे

घरी साठवून ठेवलेला आमरस खराब होऊ नये यासाठी पुढील ट्रिक्स फॉलो कराव्यात…

१. आमरस केल्यावर तो झाकण लावून डबा बंद करावा.
२. त्यात मीठ घालु नये ,थोडीशी साखर घालावी.
३. आमरस मध्ये शक्यतो दूध घालू नये.
४. फ्रिजमध्ये ठेवायचे असल्यास काचेच्या डब्यात ठेवावा.
५. रस काढताना संपूर्ण पिकलेल्या आंब्याचा वापर करावा.
६. रस काढण्याआधी आंबे थोडावेळ पाण्यात भिजवून ठेवावेत किंवा गर पाण्याने धुवून घ्यावेत.

आणखी वाचा – Mango season! आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

आंबा हे फळ वर्षातून एकदाच बाजारात उपलब्ध होत असल्याने याचा आस्वाद पुढेही घेता यावा म्हणून लोक घरच्या घरी आमरस तयार करतात. वर दिलेल्या ट्रिक्सच्या मदतीने आमरस बराच काळासाठी चांगला टिकून राहील.