-डॉ. मानसी पाटील साहित्य २५० ग्रॅ. बदाम, ८ खजूर, १ चमचा व्हॅनिला इसेन्स, ४ मोठे चमचे बदामाचे दूध, ६ मोठे चमचे किसलेला नारळ. कृती मिक्सरमध्ये खजूर आणि बदामाचे बारीक मिश्रण करून घ्या. वरील मिश्रणात व्हॅनिला इसेन्स आणि बदामचे दूध टाकून मिश्रण एकजीव करा. त्याचे ९ लाडू वा बॉल्स तयार करा. किसलेला नारळ असलेल्या छोटय़ा प्लेटवर तयार बॉल्स रोल करा.