डॉ. सारिका सातव साहित्य * आवळे-एक किलो * साखर-साडेतीन कप कृती : * आवळे स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्यावेत. * एका मोठय़ा पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. * उकळत्या पाण्यात आवळे टाकून पाच ते १० मिनिटे ठेवावे. * गॅस बंद करून एका चाळणीत आवळे काढावेत. * आता सुरीने आवळय़ाच्या फोडी सहजतेने होतात. बी काढून टाकावे. * पूर्ण थंड झाल्यानंतर आवळय़ाचे तुकडे आणि तीन कप साखर मिसळून ठेवून द्यावे. * अधूनमधून हलवत राहावे. * दोन ते तीन दिवसांनंतर आवळय़ाचे तुकडे जेव्हा भांडय़ाच्या तळाशी बसतात, तेव्हा काढून घेऊन चाळणीत घ्यावे. * द्रव सगळा निथळून गेल्यानंतर उन्हात वाळवावे. * पिठीसाखर चाळून पूर्णत: वाळवावे. नंतर हवाबंद डब्यात भरावेत. वैशिष्टय़े * ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात. * रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. * त्वचा, केस, पचनशक्ती, डोळे यांच्यासाठी अतिशय उपयुक्त.