Ashadhi Ekadashi 2023: उपवास म्हटलं की प्रत्येक घरात साबुदाना खिचडी ही ठरलेली असते. साबुदांना खिचडी कितीही चविष्ट असली तरी उपवासाला नेहमी तेच तेच खाऊन कित्येक जण कंटाळातात. तसेच खिचडी तशी पचायला जड असल्यामुळे कित्येकजण खिचडी खाणे देखील टाळतात. अशा लोकांसाठी फक्त फळ खाऊन उपवास करणे फार अवघड असते. काळजी करू नका आमच्याकडे तुमच्यासाठी एक पर्यायी पदार्थ आहे जो तुम्ही उपवासाला खाऊ शकता तो म्हणजे
उपवासाचे धिरडे. ही अगदी सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. जर तुमच्याकडे उपवासाची भाजणी तयार असेल तर तुम्ही क्षणार्धात हा पदार्थ बनवू शकता. तुमच्या उपवासासाठी हा एक चांगला बदल असू शकतो. ही चविष्ट रेसिपी तुम्ही नक्की तयार करून पाहा. मग वाट कसली पाहता. सेव्ह करा रेसिपी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य:
• १ कप उपवासाची भाजणी
• १/२ टीस्पून लाल तिखट
• १/२ टीस्पून जिरे
• चवीनुसार मीठ
• पाणी
• तेल

हेही वाचा – रताळ्याचा कीस! आषाढी एकादशी व्रत करणार्‍यांसाठी खास उपवास स्पेशल रेसिपी!

कृती:
एका भांड्यात उपवासाची भाजणी घ्या. लाल तिखट, जिरे, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. लाल तिखटाच्या जागी चिरलेली हिरवी मिरची घालू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शेंगदाणा पावडर आणि लिंबाचा रस घालू शकता. पिठात पाणी घालावे. जाडसर पीठ अजिबात करू नये. राजगिरा भरपूर पाणी शोषून घेतो म्हणून पुरेसे पाणी घाला. म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत.

मध्यम आचेवर पॅन गरम करा. तेल घालून चांगले पसरवा. एकदा पिठात मिसळा आणि घावन बनवायला सुरुवात करा. झाकण ठेवून फक्त एक मिनिट पचवा. झाकण काढा आणि खालची बाजू वळेपर्यंत घावन पचवा. उलटा करा आणि दुसऱ्या बाजूनेही साधारण एक मिनिट पचवा. एका ताटात पॅनमधून काढा.

हेही वाचा : आषाढी एकादशी स्पेशल: उपवासाचा वरी तांदळाचा शिरा कसा बनवायचा जाणून घ्या, नोट करा सोपी रेसिपी

हे चटणी किंवा दही किंवा उपवासाची बटाटा भजीसोबत बरोबर छान लागते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashadhi ekadashi 2023 want alternative for sabudana khichdi then try this crunchy upvasache dhirde save easy recipe snk
First published on: 09-06-2023 at 17:15 IST