डॉ. सारिका सातव साहित्य * खवा- एक ते अर्धा कप * पिस्ता, अंजीर, अक्रोड (बारीक तुकडे करून)- अर्धा कप * वाळवलेली फळे- अर्धा कप * वेलची पावडर- पाव चमचा * जायफळ पावडर- एक ते दोन चिमूट कृती : * खवा, सुक्या मेव्याचे तुकडे एका कढईमध्ये घेऊन मंद आचेवर हलवत राहावे. * काही वेळानंतर वाळवलेली फळे, वेलची पावडर, जायफळ पावडर टाकून चांगले हलवावे. * भांडय़ाला तूप लावून मिश्रण त्यात ओतून एकसारखे करावे आणि थंड होऊ द्यावे. * थंड झाल्यानंतर वडय़ा पाडाव्यात. वैशिष्टय़े * सुक्या मेव्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. उदा. ई जीवनसत्त्व, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लाहे इत्यादी. * चवीस उत्तम. आबालवृद्धांना उपयुक्त. * साखर नसल्याने मधुमेही व्यक्तीही खाऊ शकतात. (प्रमाणात) * लहान मुलांसाठी अतिशय उत्तम.