scorecardresearch

Premium

Basundi Recipe : मलाईदार घट्ट बासुंदी कशी बनवावी? ही सोपी रेसिपी लगेच जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला गणपती बाप्पासाठी एक गोड रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही घरी बासुंदी करू शकता. घट्ट अन् मलाईदार बासुंदी कशी बनवावी, यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.

Basundi Recipe
मलाईदार घट्ट बासुंदी कशी बनवावी? (Photo : YouTube)

Basundi Recipe : सध्या गणेशोत्सव सुरू आहे. बाप्पांच्या नैवद्यासाठी दररोज काय स्पेशल करावे, हे सुचत नाही का? टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला गणपती बाप्पासाठी एक गोड रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही घरी बासुंदी करू शकता. घट्ट अन् मलाईदार बासुंदी कशी बनवावी, यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.

साहित्य :

  • दूध
  • साखर
  • बदाम
  • पिस्ता
  • चारोळी
  • वेलची पूड

हेही वाचा : दहा मिनिटांमध्ये बनवा खमंग शेंगदाणा चटणी, सोपी रेसिपी लगेच नोट करा

Coriander Farming
घरी कोथिंबीर कशी लावायची? जाणून घ्या लागवडीची ही सोपी पद्धत
chana Dal Vada Recipe
पितृपक्ष नैवद्य थाळीसाठी चणा डाळीचे वडे करताय? असे बनवा स्वादिष्ट वडे, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
Shahi Pulao recipe
असा बनवा हॉटेलसारखा खमंग शाही पुलाव, लगेच ही सोपी रेसिपी जाणून घ्या
habits to stay fit without dieting and exercise
नेहमी तंदुरुस्त राहायचे असेल तर स्वत:ला ‘या’ ५ सवयी लावा; नेहमी राहाल निरोगी

कृती :

  • एका पातेल्यात दूध उकळत ठेवावे.
  • त्यात स्टीलची वाटी टाकावी जेणेकरुन दूध उतू जाणार नाही.
  • दुध चांगले आटवल्यानंतर त्यात प्रमाणानुसार साखर टाकावी
  • त्याबरोबर पाण्यात आधीच भिजवलेले बदाम पिस्ता टाकावे आणि चारोळी घालावी.
  • दूध आणखी पाच ते सात मिनिटे उकळत ठेवावे.
  • गॅस बंद केल्यानंतर त्यात वेलची पूड घालावी.
  • बासुंदी थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवावी यामुळे ही आणखी घट्ट होईल.
  • ही मलाईदार घट्ट बासुंदी तुम्ही सर्व्ह करावी.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Basundi recipe how to make basundi a maharashtrian sweet dish ndj

First published on: 20-09-2023 at 17:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×