Healthy Breakfast : दररोज नाश्त्याला कोणता वेगळा पदार्थ बनवावा, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे अशात आरोग्य जपत चांगला आहार घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी तुम्ही मुगडाळीचा नाश्ता करू शकता. मुगडाळ आणि साबुदाणापासून तुम्ही खूप पौष्टिक इडली बनवू शकता. ही इडली चवीला अत्यंत स्वादिष्ट असते आणि तितकीच आरोग्यासाठी चांगली असते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पदार्थ आवडू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात सकाळी नाश्ताला हा पदार्थ आवर्जून करून पाहा. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा.

साहित्य

 • मुगडाळ
 • साबुदाणा
 • दही
 • बारीक चिरलेली मिरची
 • बारीक किसलेले आले
 • बारीक किसलेला गाजर
 • बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर
 • तेल
 • मोहरी
 • जिरे
 • हिंग
 • मीठ
 • बेकींग सोडा
 • लिंबू

हेही वाचा : नाचणी-तांदळाची भाकरी नेहमीच खातो, खाऊन पाहा ज्वारीची ‘मसाला भाकरी’; ही घ्या सोपी रेसिपी

Healthy Breakfast Recipes Indian Ragi idli recip
रविवारी नाश्त्यात रोजच्या इडलीऐवजी बनवा नाचणीची इडली; पटकन नोट करा सोपी रेसिपी
maharashtrian bhakri recipe easy masala bhakri recipe in marathi
नाचणी-तांदळाची भाकरी नेहमीच खातो, खाऊन पाहा ज्वारीची ‘मसाला भाकरी’; ही घ्या सोपी रेसिपी
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Authentic Maharashtrian Mokala Zunka or Korada Zunka Note The Tasty And Quick Recipe In marathi
‘मोकळा झुणका’ कधी खाल्ला आहे का? प्रवासातही बिनधास्त घेऊन जाऊ शकता; रेसिपी लगेच नोट करा
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
aishwarya narkar answer to netizen who troll avinash narkar dance
Video: अविनाश नारकरांचा नेटकऱ्यांना खटकला डान्स, ऐश्वर्या नारकर स्पष्टच म्हणाल्या, “तो…”

कृती

 • अर्धा कप मुगडाळ आणि एक चमचा साबुदाणा घ्या.
 • मुगडाळ आणि साबुदाणा तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
 • त्यानंतर शेवटी पाणी घालून मुगडाळ आणि साबुदाणा दोन ते तीन तास भिजू घाला.
 • दोन ते तीन तासानंतर भिजवलेली डाळ आणि साबुदाणामध्ये दही घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
 • बारीत वाटून घेतलेले डाळ आणि साबुदाण्याचे मिश्रण चांगले फेटून घ्या.
 • त्यानंतर त्यात बारीक चिरलेली मिरची, किसून घेतलेले आले, किसून घेतलेला गाजर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यात एकत्रित करा.
 • सर्व मिश्रण एकजीव करा.
 • गॅसवर कढईत तेल गरम करा.
 • त्यात मोहरी, जिरे, कढपत्ता आणि हिंग घालून तडका तयार करा.
 • त्यात चवीनुसार मीठ घाला.
 • थोडा बेकींग सोडा टाका आणि लिंबाच रस टाका.
 • हे सर्व मिश्रण एकत्र करा.
 • त्यानंतर इडली पात्राला थोडं तेल लावा.
 • त्यानंतर इडली पात्रामध्ये हे मिश्रण टाका.
 • आठ ते दहा मिनिटानंतर या इडल्या टम्म फुगलेल्या दिसतील.
 • पाच ते दहा मिनिटानंतर इडल्या थंड होऊ द्या आणि त्यानंतर चमच्याने या इडल्या काढून घ्या
 • या इडल्या तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा दही बरोबर खाऊ शकता.
 • मुगडाळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून उन्हाळ्यासाठी एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे.
 • मुगडाळ ही थंडी असते त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी हा नाश्ता तुम्ही करू शकता.