Dairy Milk Chocolate Ice Cream : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेट आवडते. असा क्वचिकत कोणी असेल की ज्याने हे चॉकलेट खाल्ले नसेल किंवा हे चॉकलेट आवडत नसेल. तुम्ही कधी या चॉकलेटपासून घरच्या घरी आईस्क्रिम बनवली आहे का? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण या चॉकलेटपासून तुम्ही टेस्टी आईस्क्रीम बनवू शकता. फक्त दूध आणि बदामचा वापर करून तुम्ही ही आईस्क्रिम बनवू शकता. (Cadbury dairy milk chocolate Ice cream recipe how to make dairy milk ice cream watch video)

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही आईस्क्रीम कशी बनवायची? त्यासाठी तुम्हाला एक व्हिडीओ पाहावा लागेल जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटपासून आईस्क्रीम कशी बनवावी हे सांगितले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे – (Dairy Milk Chocolate Ice Cream)

साहित्य

  • कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेट
  • गरम पाणी
  • बदाम
  • दूध

हेही वाचा : Diwali Special Protein Laddoos : यंदा दिवाळीत बनवा भरपूर प्रोटीन असणारे लाडू, फक्त ‘या’ चार बिया अन्…; तुमचे लाडू झटपट तयार

कृती

  • सुरुवातीला एक कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेट घ्या.
  • त्यानंतर हे पॅकबंद चॉकलेट कव्हरसहीत एका गरम पाण्याचा वाटीत टाका.
  • यामुळे चॉकलेट पूर्णपणे वितळून जाईल.
  • त्यानंतर कात्रीने चॉकलेट नीट एका बाजूने कापून घ्या.
  • त्यानंतर बदामाचे बारीक बारीक तुकडे करा.
  • हे तुकडे त्या वितळलेल्या चॉकलेचमध्ये टाका.
  • त्यानंतर त्यात दूध टाका.
  • आईस्क्रीम काडीने सर्व मिश्रण एकत्र करा व काडी चॉकलेटमध्ये ठेवा. त्यानंतर चॉकलेट एका छोट्या ग्लासमध्ये ठेवा आणि हा ग्लास फ्रिजमध्ये ठेवा.
  • काही तासानंतर तुम्हाला अतिशय टेस्टी अशी आईस्क्रीम बनलेली दिसून येईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

virenkitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “डेअरी मिल्क आईस्क्रीम”

हेही वाचा : Coconut Jaggery Barfi : यंदा दिवाळीत बनवा तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी? नक्की ट्राय करा ‘ही’ रेसिपी; अगदी कमी मेहनत लागेल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी घरी बनवून बघणार, मस्त रेसिपी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान रेसिपी आहे, धन्यवाद व्हिडीओ शेअर केल्याबद्दल” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला चोकोबार म्हणतात.” अडीच लाखांहून अधिक युजर्सनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

Story img Loader