संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर तुम्ही काय करता? हात-पाय धुऊन आधी काहीतरी खायला शोधता! दिवसभर काँप्युटरसमोर बसून बसून तुमची बॅटरी डाऊन झालेली असते, त्यामुळे काही करायलाही कंटाळा येतो. मात्र काळजी करु नका संध्याकाळच्या नाश्त्याला आज आम्ही तुमच्यासाठी पौष्टीक आणि सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. चल तर पाहुयात चवळीचे कुरकुरीत कटलेट कसे बनवायचे.
चवळीचे कटलेट साहित्य –
- चवळी दोन ते अडीच मोठे चमचे
- रवा दोन-तीन चमचे (आवरणासाठी)
- लहान कांदा, चवीसाठी आलं-हिरवी मिरची पेस्ट
- गरम मसाला, मीठ, चाट मसाला
- कोथिंबीर, लिंबू, तेल २-३ तीन चमचे
चवळीचे कटलेट कृती –
- चवळी आदल्या रात्री ८-१० तास भिजवून घ्या. कुकरमध्ये चवळी शिजवून घ्या (पाणी निथळून घ्या.
- चवळी हाताने कुस्करून घ्या. त्यात चिरलेला कांदा घालून एकत्र करा.
- चवीसाठी आलं- हिरवी मिरची पेस्ट, गरम मसाला, मीठ, चाट-मसाला, कोथिंबीर, लिंबू रस घालून मिश्रण हाताने एकजीव करा.
- टिक्की स्वरूपात मिश्रण मळून घ्या. टिक्क्या रव्यात घोळवून घ्या. तवा गरम करून त्यात तेल सोडा.
- बनलेल्या मिश्रणाच्या टिक्क्या दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या.
हेही वाचा – Healty breakfast: सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट कधीच चुकवून नका, ही घ्या सोपी रेसीपी

पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!

“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”
टीप – खजूर-चिंचेची चटणीबरोबर या टिक्क्यांचा आस्वाद घ्या.