संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर तुम्ही काय करता? हात-पाय धुऊन आधी काहीतरी खायला शोधता! दिवसभर काँप्युटरसमोर बसून बसून तुमची बॅटरी डाऊन झालेली असते, त्यामुळे काही करायलाही कंटाळा येतो. मात्र काळजी करु नका संध्याकाळच्या नाश्त्याला आज आम्ही तुमच्यासाठी पौष्टीक आणि सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. चल तर पाहुयात चवळीचे कुरकुरीत कटलेट कसे बनवायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चवळीचे कटलेट साहित्य –

  • चवळी दोन ते अडीच मोठे चमचे
  • रवा दोन-तीन चमचे (आवरणासाठी)
  • लहान कांदा, चवीसाठी आलं-हिरवी मिरची पेस्ट
  • गरम मसाला, मीठ, चाट मसाला
  • कोथिंबीर, लिंबू, तेल २-३ तीन चमचे

चवळीचे कटलेट कृती –

  • चवळी आदल्या रात्री ८-१० तास भिजवून घ्या. कुकरमध्ये चवळी शिजवून घ्या (पाणी निथळून घ्या.
  • चवळी हाताने कुस्करून घ्या. त्यात चिरलेला कांदा घालून एकत्र करा.
  • चवीसाठी आलं- हिरवी मिरची पेस्ट, गरम मसाला, मीठ, चाट-मसाला, कोथिंबीर, लिंबू रस घालून मिश्रण हाताने एकजीव करा.
  • टिक्की स्वरूपात मिश्रण मळून घ्या. टिक्क्या रव्यात घोळवून घ्या. तवा गरम करून त्यात तेल सोडा.
  • बनलेल्या मिश्रणाच्या टिक्क्या दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या.

हेही वाचा – Healty breakfast: सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट कधीच चुकवून नका, ही घ्या सोपी रेसीपी

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavli cutlet recipe in marathi evening brekfast easy and testy recipe srk
First published on: 08-06-2023 at 17:05 IST