scorecardresearch

Chole Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखे चटपटीत छोले फ्राय; ही घ्या सोपी रेसिपी

Chole Recipe :खवय्यांसाठी सुखाचा मार्ग हा पोटातून जातो. त्यामुळे खवय्ये आपल्या जीभेचे फार लाड करत असतात. अशाच खवय्यांसाठी घेऊन आलो आहोत छोले फ्राय

chole fry
चटपटीत छोले फ्राय (photo – indian express)

Chole Recipe : खवय्यांसाठी सुखाचा मार्ग हा पोटातून जातो. त्यामुळे खवय्ये आपल्या जीभेचे फार लाड करत असतात, तुम्ही अनेकवेळा रेस्टॉरंटमध्ये छोले खाल्ले असतील पण घरी छोले बनवता तेव्हा त्याची चव रेस्टॉरंटच्या स्टाईलसारखी नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईलमध्ये लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील छोले फ्राय कसे बनवावे ही सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही डिनर किंवा लंच स्पेशल करण्यासाठी ही रेसिपी बनवू शकता. घरच्या घरी चला, रेस्टॉरंट स्टाईल छोले फ्राय कसे बनवायचे ते जाणून घेवूया..

छोले फ्राय साहित्य –

पाव किले उकडलेले छोले, १ वाटी सुके खोबरे, २ कापून तळलेले कांदे, ४-५ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, थोडी कोथिंबीर, मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, १ चमचा छोले मसाला, २ चमचे तीळ, तेल, हळद, २ चमचे बटर

छोले फ्राय कृती –

सुके खोबरे भाजून घ्यावे. तळलेला कांदा, खोबरे, आले, लसूण, कोथिंबीर एकत्र बारीक वाटावी. तव्यावर चांगले एक मोठा चमचा तेल घालावे. त्यावर तीळ घालावे. हळद घालून वाटून ठेवलेला मसाला घालावा. त्यावर उकडलेले छोले थोड्या पाण्यासकट तव्यावर घालावे. लगेचच चवीनुसार लाल मिरची पावडर १ चमचा घालावी. पाव चमचा गरम मसाला पावडर, छोले मसाला घालावा. मंद आचेवर छोले फ्राय करावेत. तेल सुटेपर्यंत छान परतावे. नंतर ते एका भांड्यात काढावे आणि वरुन बटर घालावे. आपले स्वादिष्ट असे छोले फ्राय खाण्यासाठी तयार आहेत.

हेही वाचा – सावधान! ‘या’ सहा सवयी व्यक्तिमत्त्वासाठी ठरू शकतात घातक, जाणून घ्या सविस्तर

गरम गरम छोले फ्राय लिंबू, कांदा, कोथिंबीर व पुरीबरोबर द्यावेत, छान टेस्टी लागतात. तर आजच ट्राय करुन पाहा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 19:36 IST

संबंधित बातम्या