scorecardresearch

मालवणी कोंबडी वड्यांनी खास करा संडे; खुसखुशीत वड्यांसाठी जाणून घ्या सोपी ट्रिक

आज आम्ही तुम्हाला अस्सल मालवणी पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत

Kombadi vade Cooking Tips
अनेक लोकांना सतत वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्याची आणि खाण्याची खूप आवड असते. (Photo : Instagram)

अनेक लोकांना सतत वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्याची आणि खायची खूप आवड असते. यामध्ये प्रामुख्याने मासांहार करणारे लोक आघाडीवर असल्याचं दिसत. सध्याच्या जॉब कल्चरमुळे अनेकांना कामाच्या वेळेत त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे असे लोक विकेंडला काहीतरी खास मांसाहारी जेवणाचा बेत करतात.

चिकन आणि मटण अनेकांच्या आवडीचा विषय आहे. अशात जर मालवणी पद्धतीचा मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी बनवला तर लोकांसाठी मांसाहार प्रेमींसाठी यापेक्षा वेगळं सुखं काय असू शकतं? आज आम्ही तुम्हाला अशाच एका मालवणी पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. ती रेसिपी म्हणजे अस्सल मालवणी चविष्ठ आणि पोषक असणारे कोंबडी वडे आणि रस्सा, हे पदार्थ बनवण्यासाठी लागणापे साहित्य आणि ते बनवण्याची कृती जाणून घ्या.

हेही पाहा- मऊ लुसलुशीत शिरा खायला तुम्हालाही आवडतो? तर ट्राय करा ‘मुगाचा शिरा’, जाणून घ्या ही भन्नाट रेसिपी

कोंबडी वडे करण्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे –

चिकन रस्सा साहित्य –

५०० ग्रॅम चिकन, १ वाटी नारळाचे दूध १ मोठा चमचा, आलं-लसणाचे वाटण, अर्धा मोठा चमचा हळद, १ मोठा चमचा गरम मसाला, २ मोठे चमचे तेल, १ तुकडा दालचिनी, कापलेला कांदा १ वाटी, अर्धा किसलेला नारळ, पाणी, १ मोठा चमचा धणे, १०-१२ काळीमिरी, ४ लवंगा, १ मोठा चमचा खसखस.

कृती –

हेही वाचा- कच्च्या टोमॅटोची झणझणीत चटणी कधी ट्राय केलीय? नसेल तर आजचं बनवा ही सोपी रेसिपी

सर्व प्रथम १ मोठा चमचा आलं-लसणाचे वाटण करुन घ्या, त्यातच अर्धा मोठा चमचा हळद, १ मोठा चमचा गरम मसाला लावून एकत्र सर्व चिकनला व्यवस्थित चोळून घेऊन ते बाजूला ठेवून द्या. वाटणासाठी एका भांड्यात तेल घेऊन त्यावर लवंग, काळीमिरी, दालचिनी, कांदा आणि खोवलेलं खोबरं घेऊन चांगलं खरपूस भाजून घ्या. ते थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या, रस्सा करण्यासाठी एक भांड्यात तेल तापवून घेऊन त्यात वरील वाटलेलं वाटण घालून परतवून घ्या आणि त्यात मसाला लावलेलं चिकन घालून परत एकदा चांगलं परतून घ्या. त्यात थोडे पाणी घालून, पुन्हा एक चमचा गरम मसाला घालून चांगले एकत्र करुन चिकन नेहमीप्रमाणे शिजण्यास ठेवा.

हेही वाचा- सुक्या बांगड्याची झणझणीत कोशिंबीर कधी खाल्लीये का? नसेल तर आजच घरी बनवा, पाहा रेसिपी

वडे साहित्य –

४ मोठे चमचे उडीद डाळ, १ मोठा चमचा जिरे, १०-१२ मेथीचे दाणे, १ वाटी बेसन, २ वाटी तांदूळ पीठ, १ वाटी गव्हाचे पीठ, अर्धा मोठा चमचा हळद, २ मोठे चमचे तेल, मीठ, पाणी, तळण्यासाठी तेल.

कृती –

प्रथम आदल्या रात्री उडदाची डाळ, जिरे, मेथीचे दाणे भिजत घाला. दुसऱ्या दिवशी वडे करण्याच्या वेळीस वाटून घ्या. मोठ्या भांड्यामध्ये ते काढून घेऊन त्यात तांदूळ पीठ, बेसन, गव्हाचे पीठ, अर्धा चमचा हळद आणि दोन मोठा चमचा तेल घाला आणि लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्या. फार घट्टही नाही आणि फार मऊसुद्धा नाही असे मध्यम पीठ मळून घ्या. नंतर ते प्लास्टिकच्या पिशवीवर तेल लावून थापून घ्या. अलगद हाताने गरम तेलात सोडा म्हणजे चांगले फुगून कोंबडीवडे तयार होतील अशा प्रकारे तुमचे चविष्ट असे कोंबडी वडे तयार होतील.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-02-2023 at 19:10 IST

संबंधित बातम्या