How to Make Crispy Chakli : चकल्या हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतात. गौरी गणपतीच्या वेळी पंचपक्वान्न केले जातात त्यात आवर्जून चकल्या बनवल्या जातात. अनेक जणांची तक्रार असते की खूप प्रयत्न करुनही चकल्या कुरकुरीत होत नाही. टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत चकल्या बनवण्यासाठी खास टिप्स आणि सोपी रेसिपी सुद्धा सांगत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही खुसखुशीत चकल्या बनवू शकता.

साहित्य :-

  • तांदूळ
  • चण्याची डाळ
  • उडदाची डाळ
  • मूगाची डाळ
  • तिखट
  • हळद
  • ओवा
  • पांढरे तीळ
  • चकली मसाला
  • तेल
  • मीठ

हेही वाचा : Ukadiche Modak : गणपतीच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे? नोट करा ही सोपी रेसिपी

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण

कृती :

  • तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि मूगाची डाळ मंद आचेवर भाजून घ्या.
  • सर्व धान्य एकत्र करुन जाडसर पीठ दळून आणा
  • एका भांड्यात पाणी उकळून घ्यावे.
  • दळून आणलेल्या पीठात हळद, ओवा, पांढरे तीळ, मीठ, चकली मसाला तिखट आणि मोहन तेल टाका.
  • गरम पाण्याने हे पीठ मळून घ्या.
  • हे मळलेलं पीठ चकलीच्या सांच्यात भरा आणि चकल्या पाडा.
  • मंद आचेवर चकल्या तळून घ्या

चकल्या कुरकुरीत होण्यासाठी काय करावे?

१. धान्य चांगले भाजले नाही तर चकल्या कुरकुरीत होत नाही. त्यामुळे धान्य चांगले भाजावे.
२. चकलीत मोहन तेल योग्य प्रमाणात टाकावं. तेलाचं प्रमाण जास्त झाल्याने चकल्या कुरकुरीत होत नाही.
३. चकल्या नेहमी मंद आचेवर तळाव्यात.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)