Mini Samosa Recipe: समोसा हा असा पदार्थ आहे जो लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. सगळेच अगदी आवडीने हा खमंग पदार्थ खाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. समोस्याचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. सगळ्यांनीच समोसा, पोटली समोसा असे समोस्याचे अनेक प्रकार ट्राय केले असतील. पण कधी तुम्ही मिनी समोसा घरच्या घरी बनवून खाल्ला आहे का? ही नवीन रेसिपी तुम्ही घरच्याघरी ट्राय करू शकता. कुरकुरीत, खमंग असा हा क्रिस्पी मिनी समोसा तुम्हाला बनवून पाहायचा असेल तर लगेच साहित्य आणि कृती वाचा.

हेही वाचा… Kaju Katli Recipe: दिवाळी स्पेशल ‘काजू कतली’ बनवायचीय? मग घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने ट्राय करा रेसिपी

dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती

क्रिस्पी मिनी समोसा साहित्य

मैदा

मीठ

२ टेबलस्पून तेल

२ उकडलेले बटाटे

१ चिरलेला कांदा

१ चिरलेली हिरवी मिरची

अर्धा टेबलस्पून मीठ

अर्धा टेबलस्पून हळद

अर्धा टेबलस्पून गरम मसाला

हेही वाचा… सुरसुरी, चकरी अन् बॉम्ब! दिवाळीत बनवा माव्यापासून चवदार मिठाई, ट्रेंडिंग रेसिपी लगेच ट्राय करा

u

क्रिस्पी मिनी समोसा कृती

१. मैदा, मीठ, २ टेबलस्पून तेल आणि पाणी वापरून सौम्य कणिक तयार करा.

२. बटाट्याच्या फिलिंगसाठी: २ उकडलेले बटाटे, १ चिरलेला कांदा, १ चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टेबलस्पून मीठ, अर्धा टेबलस्पून हळद आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला घाला.

३. पिठाची छोटीशी पोळी थापून त्यात फिलिंग भरा.

४. पोळीच्या कडांवर पाणी लावून समोसा सारखा आकार द्या.

५. हलक्या आचेवर तेलात तळा.

६. गरमागरम टोमॅटो केचअप सोबत सर्व्ह करा.

तुमचे कुरकुरीत आणि चविष्ट क्रिस्पी मिनी समोसे तयार आहेत.

ही रेसिपी @khanaPeenaRecipes या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader