Shravan 2023: हा श्रावण महिना भगवान शिवशंकराला समर्पित केला जातो. भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी आराधना केली जाते, उपवास केला जातो. या श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खायचं, हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलोय. तुम्ही कधी उपवसाचे खुसखुशीत थालीपीठ ट्राय केले का? चला तर स्पेशल उपवसाचे खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे जाणून घेऊया.

‘उपवासाचे थालीपीठ’ बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

Bharli Wangi with Sode recipe in marathi
बटाटा वांगी घालुन सोड्याचे झणझणीत कालवण; चमचमीत रेसिपी खाल तर खातच रहाल
Healthy Midnight Snacks Option
रात्री तूप लावलेला ‘हा’ पराठा खाल्ल्याने पचनही होईल वेगवान; तीन वस्तू वापरून करायची रेसिपी व फायदे जाणून घ्या
Mutton Keema Matar Pav Recipe In Marathi
पावसाळ्यात असा चमचमीत मसालेदार ‘खिमा पाव’ घरी केल्यावर हॉटेलचं खाणं विसरून जाल; नोट करा सोपी रेसिपी
How to Grow Tulsi Plants Faster Video
४ दिवसांत तुळस डेरेदार वाढण्यासाठी कडुलिंब व चहा पावडरचा जुगाड; जुलैमध्ये कशी घ्यावी तुळशीची काळजी? Video पाहा
Essential motorcycle gear to carry during monsoon rides
पावसाळ्यात फिरायला जाताय? मग अशी करा तयारी; ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
Monsoon foods: Which ones should you eat and which ones should you avoid
Monsoon foods : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत? डॉक्टरांकडून घ्या जाणून….
KurdaiChi Bhaji Marathi Recipe
खानदेशी पद्धतीने करा स्पेशल कांदा कुरडई; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी
Shevgyachi Chutney Recipe & Benefits:
५ मिनिटांत बनवा शेवग्याच्या पानांची ठेचा चटणी, डॉक्टरांनी सांगितलं डोळे, त्वचा व वजन नियंत्रणासाठी कशी होईल मदत?
 • उकडलेले बटाटे – २
 • भाजलेला साबुदाणा – २ वाटी
 • भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट – १ वाटी
 • हिरव्या मिरच्या – ५ ते ६
 • तूप किंवा तेल – १ चमचा
 • मीठ – चवीनुसार

‘उपवासाचे थालीपीठ’ बनवण्याची कृती –

 • ‘उपवासाचे थालीपीठ’ बनवण्यासाठी सर्वात आधी उकडलेला बटाटा बारीक खिसावा.
 • मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या.
 • भाजलेला साबुदाणा , शेंगदाण्याचे कूट, वाटलेल्या मिरच्या, खिसलेला बटाटा , चवीनुसार मीठ एकत्र करावे.
 • तयार झालेल्या मिश्रणात लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ मळल्यानंतर ते थालीपीठाप्रमाणे थापून घ्यावे.
 • एकीकडे गॅसच्या मध्यम आचेवर तवा तापत ठेवावा. तवा तापल्यानंतर त्यात तेल किंवा तूप घालावे.
 • थापलेले थालीपीठ झाकण ठेऊन मध्यम आचेवर भाजून घ्यावे. त्यानंतर पाच मिनिटांनी झाकण काढून थालीपीठ दुसऱ्या बाजूला करावे.

हेही वाचा >>श्रावणी शनिवार: उपवासासाठी करा खास ‘केळीची खीर’, लगेच नोट करा टेस्टी रेसिपी

 • तयार झालेले थालीपीठ दह्यासोबत चविष्ट लागते.